शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे गगनगड ते दाजीपूर घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:46 IST

कोल्हापूर : येथील शहीद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येणार

ठळक मुद्दे१९९२ मध्ये स्थापन झालेल्या फौंडेशनने युवक-युवतींमध्ये साहसी वृत्ती वाढीस लागावी म्हणून हिमालयात मोहिमा यशस्वीपणे केल्या

कोल्हापूर : येथील शहीद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कॅम्प लीडर पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी दिली.

पहिल्या दिवशी मोरजाईचा सडा येथील सूर्यास्त पाहून रात्री स्लाईड शो, आकाशदर्शन, कॅम्प फायर आणि बोरबेटला मुक्काम असे नियोजन आहे. दुसºया दिवशी जंगल तुडवत दुपारी एक वाजेपर्यंत बायसन टॉवर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत गगनगिरी आश्रमात रात्रीचे जेवण, कॅम्प फायर, तिसºया दिवशी दाजीपूरच्या जंगलात पदभ्रमंती केल्यानंतर दुपारनंतर कोल्हापूरला परत असे या मोहिमेचे नियोजन आहे.

फौंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प लीडर संजय जाधव, ग्रुप लीडर हृषिकेश केसकर, नितीन जाधव, सतीश पाटील, क्षितिजा जाधव, संग्राम पाटील (सडोलीकर), सेंट्रल एक्साईजचे सुपरिंटेंडेंट राजेंद्र गुंडाळे, अमर पाटील, अविनाश लाड, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सार्थक जाधव, राजू माने यांच्यासह बोरबेट आणि महादेव मंदिराच्या (गगनगिरी आश्रम) व्यवस्थेसाठीची समिती कार्यरत आहे.सेव्हन सिस्टर मोहीम २०१८ मध्येकोल्हापूर माउंटेनिअरिंग अ‍ॅडव्हेंचर्स क्लबच्या माध्यमातून १९७८ पासून दाजीपूर पदभ्रमंती मोहीम अविरत सुरू आहे. याच क्लबचे हरहुन्नरी, तडफदार साहसी फौजदार राजू जाधव मुंबईत शीख अतिरेक्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत हुतात्मा झाले. त्यांची आठवण म्हणून १९९२ मध्ये स्थापन झालेल्या फौंडेशनने युवक-युवतींमध्ये साहसी वृत्ती वाढीस लागावी म्हणून हिमालयात मोहिमा यशस्वीपणे केल्या. २०१८ मध्ये नॉर्थ-ईस्ट हिमालयीन सेव्हन सिस्टर मोहीम आहे. सहभागासाठी अध्यक्ष अ‍ॅड. विजय जाधव, शारदा हौसिंग सोसायटी, राजारामपुरी, आठवी गल्ली, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.